सचिन गाड, प्रतिनिधी
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच मुंबई हायकोर्टात थेट ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणाचे सर्वेक्षण करावं आणि ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करावा, अशी मागणी या याचिकेत केली असून या याचिकेवर आज होणारी सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी (OBS Reservation) कमिशनची रचना केली नाही, उलट ओबीसी आरक्षण वाढवले, असे म्हणत महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा, ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करा आणि तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्या, अशी याचिका मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे (Balasaheb Sarate) यांनी केली आहे.
या संदर्भातल्या प्रलंबित याचिकेवर आज (मंगळवार, ७ ऑक्टोंबर) सुनावणी घ्यायला मुख्य न्यायमूर्तींनी नकार दिला. त्यामुळे उद्या ८ ऑक्टोंबर ला याबाबतची सुनावणी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पार पडेल. बाळासाहेब सराटेंसह प्रशांत भोसले आणि शिवाजी कवठेकर यांच्याकडूनही मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
काय म्हणाले बाळासाहेब सराटे?
दरम्यान, याबाबत बोलताना याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे यांनी आम्ही कुठलीही घटनाबाह्य बेकायदेशीर मागणी केली नाही, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी कमिशनची रचना केली नाही, उलट ओबीसी आरक्षण वाढवले असल्याचा दावा केला आहे.
तसेच आम्ही कोणतीही भांडणे लावत नाही, भांडण करण्यासाठी प्रवृत्त करीत नाही. मात्र, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) इथे येऊन समाजा-समाजामध्ये भांडण लावत आहेत. भुजबळ ओबीसी नेते कसले? चार जातींना घेऊन ओबीसी राजकीय स्वार्थ साधत आहेत.. असा आरोपही सराटे यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.