विरोधकांचा "सत्याचा मोर्चा" मुंबईत पार पडला.
भाजपकडून प्रतिउत्तर म्हणून "मूक मोर्चा" काढण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर टीका करत कट हाणून पाडण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीवर निर्णयक्षमतेचा अभाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
निवडणुक आयोग आणि मतदार याद्यांमधील घोळ या सगळ्याच्या विरोधात विरोधी पक्षाचा सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये पार पडला. या मोर्चामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, बाळसाहेब थोरात यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल चढवला.
एकीकडे हा मोर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपकडून यालाच प्रतिउत्तर म्हणून मुक मोर्चा काढण्यात आला. नेहमीच शांत आणि संयमी दिसणारे भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा निर्धार एक महिन्याआधीच केला होता. हा मोर्चा जनतेची दिशा भूल करणारा मोर्चा आहे. विरोधकांचा मोर्चा आहे असे समजू नका असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
अनेक एनजीओ या विरोधकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेला विनंती आहे की हा यांचा कट हाणून पाडा. एका चांगल्या दिशेने महाराष्ट्राला न्यायचे आहे. स्वप्नातला महाराष्ट्र पिरीयड इकॉनॉमिकडे पाहत आहे. बूथ कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावावा, घरोघरी जाऊन नागरिकांना स्पष्ट सांगितले पाहिजे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. बिहार निवडणुकीत वेगळे परिणाम दिसू नये म्हणून कॉँग्रेसने अंग काढून घेतले. नेमकी यांची भूमिका काय? पुढे काही न्यायचे आहे का? याची स्पष्टता यांच्याकडून आली नाही. यांची बिघाडी आहे. यांच्या सत्तेच्या अडीच वर्षात हे कधीच एकमताने निर्णय घेऊ शकले नाही. तसेच कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉमन अजेंड्यावर काम करू शकले नाही असेही चव्हाण म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.