Satyacha Morcha : मुंबईत सरकारविरोधात गोंधळ, शिवसैनिकांचा एल्गार, भाजप-शिंदे गटाला थेट इशारा

MVA and MNS workers gather in huge numbers for Satyacha Morcha : मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेच्या ‘सत्याचा मोर्चा’दरम्यान मोठी गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळाला. शिवसैनिकांनी भाजप–शिंदे सरकारविरोधात संतप्त घोषणाबाजी करत इशारा दिला.

Shiv Sainiks warn BJP–Shinde group during Satyacha Morcha in Mumbai : मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या 'सत्याचा मोर्चा' निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी 'गोंधळ' घालून अनोखं आंदोलन केलं. यावेळी एका आंदोलकाने संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या पुढार्‍यांना आज आग लागणार आग.' संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी भावनाही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पुण्यातील कसबा मतदार संघ आणि नाशिकमधून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते, ज्यामुळे मेट्रो सिनेमा परिसरात एकच गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com