Ravikant Tupkar saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar: आत्मदहनाच्या घोषणेवर ठाम असलेले रविकांत तुपकर भूमिगत! पोलिसांकडून कारवाईचा इशारा

Ravikant Tupkar: तुपकर यांनी आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून आता माघार घेणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे.

Chandrakant Jagtap

>> संजय जाधव

Ravikant Tupkar: बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आत्मदहनाच्या घोषणेवर ठाम असलेले रविकांत तुपकर भूमिगत झाले आहेत. यावंतर बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबईत येथील विमा कंपनीसमोर आत्मदहन करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता ते भूमिगत झाले आहे.

रविकांत तुपकर यांनी आपण संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत, आता शहीद झालो तरी आता माघार घेणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. आहे. दरम्यान बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.

पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंवा एआयसी पीकविमा कंपनीच्या ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

सध्या ते भूमिगत आहेत. रविकांत तुपकर आपल्या भूमिकेवर कायम असून आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, आरपारची लढाई लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे, असे ‘स्वाभिमानी’च्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Back Neck Design: ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे डिझाईन्स, तुमचा लूक दिसेल आकर्षक

Dharashiv Flood: धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार, भीषण पूरस्थिती; मात्र जिल्हाधिकारी डान्स करण्यात दंग; पाहा VIDEO

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT