RAVIKANT TUPKAR HUNGER STRIKE DAY 3: FARMERS DEMAND BLANKET LOAN WAIVER AS PROTESTS INTENSIFY ACROSS MAHARASHTRA Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : बुलढाण्यात शेतकरी आंदोलन पेटले! रविकांत तुपकरांच्या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी एसटी बस जाळली

Ravikant Tupkar News : सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरातून शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून विविध ठिकाणी आंदोलन तीव्र झाले आहे.

Alisha Khedekar

  • रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस

  • शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी

  • तुपकर यांची प्रकृती खालावत असली तरी ते आंदोलनावर ठाम

  • सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी

संजय जाधव, बुलढाणा

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा येथील घरासमोर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने शेतकरी आणि तुपकर समर्थकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहतील, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. तुपकर यांच्या आंदोलनाला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

बुलढाणा-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील धाड येथे कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच इतर भागांमध्येही तुपकर यांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शासनाकडे शेतकऱ्यांसाठी निधी नसल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुलढाणा शहरात दिवसभर भीक मागून आंदोलन केले. या माध्यमातून जमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. या आंदोलनाची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे.

अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र प्रकृती खालावत असतानाही तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी आणि आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी आता शेतकरी संघटना आणि समर्थकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : हजारो पायऱ्या चढल्यानंतर दिसतो अद्भूत नजारा, नाशिकमधील' हे' ठिकाण आयुष्यात एकदा तरी पाहा

Jackfruit Seeds Vada Recipe : वटपौर्णिमेला खास बनवा खमंग-कुरकुरीत फणसाच्या बियांचे वडे, एकदा ट्राय करा ही कोकणी रेसिपी

Maharashtra News Live Update: ऑपरेशन टायगरची पुण्यात चर्चा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार, कोणत्या ६ खासदारांनी सोडली साथ? सर्वांची नावं आली समोर

Todays Horoscope: प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये आज कोणाची लागणार लॉटरी? वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT