अमरावतीत उद्योग स्थापन करण्यासाठी रवी राणांची बाबा रामदेवां कडे मागणी Saam TV
महाराष्ट्र

अमरावतीत उद्योग स्थापन करण्यासाठी रवी राणांची बाबा रामदेवां कडे मागणी

पतंजली समूहातर्फे अमरावती येथे फळे व कृषी उत्पादने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.

अरुण जोशी

अमरावती येथील नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसी मध्ये पतंजलीच्या माध्यमातून संत्रा, डाळिंब, केळी, आवळा, सीताफळ, सोयाबीन, मका, मुंग इत्यादी कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची विनंती आमदार रवी राणा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांना केली. लवकरच अमरावतीत उद्योगासाठी जागा पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन यावेळी बाबा रामदेव यांनी आमदार रवी राणा यांना दिल्याची माहिती आहे. मेळघाटातील आदिवासींना आपल्या हक्काचा रोजगार मिळावा यासाठी मोह मोहफुल या औषधयुक्त नैसर्गिक फळांचा वापर करून त्यापासून आयुर्वेदिक औषधी निर्माण केल्यास धारणी-चिखलदरासह मेळघाटातील आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल व आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही अशी भूमिका यावेळी आमदार राणा यांनी बाबा रामदेव यांच्यापुढे मांडली.

पतंजली समूहातर्फे अमरावती येथे फळे व कृषी उत्पादने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील इतर शेतकऱयांना त्याचा लाभ होईल, त्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळेल, शेतकरयांना हक्काची बाजारपेठ मिळेल व विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईल असे आमदार रवी राणा यांनी बाबा रामदेव यांच्या निदर्शनास आणून दिले. या उद्योगामुळे अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल व हजारो स्थानिकांना काम मिळेल त्यामुळे पतंजलीने नांदगाव पेठ पंचतारांकित एम आय डी सी मध्ये मोठा कृषि उत्पादन प्रक्रिया प्रकल्प सुरू करावा अशी आग्रही मागणी आमदार रवी राणा यांनी बाबा रामदेव यांना केली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT