Ravi Rana Saam Tv News
महाराष्ट्र

Amravati Politics: अमरावतीत गरम चहामुळे राजकीय वातावरण तापलं! रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जुगलबंदी

Ravi Rana invites Bacchu Kadu: माझ्या निवास्थानावर बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना चहा प्यायला आमंत्रण देण्यासाठी मी तयार आहे. जिल्ह्यातील कोणताही नेत्यासोबत माझं वैर नाही, असं वक्तव्य आमदार रवि राणा यांनी केलंय.

Bhagyashree Kamble

आमदार रवी राणा यांनी अमरावतीत एक मोठं वक्तव्य केलं आहे.'माझ्या निवास्थानावर बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना चहा प्यायला आमंत्रण देण्यासाठी मी तयार आहे. किंवा त्यांच्या घरी जाऊन चहा घ्यायला तयार आहे. जिल्ह्यातील कोणताही नेत्यासोबत माझं वैर नाही, असं वक्तव्य आमदार रवि राणा यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमात केलंय. त्यांच्या या विधानाला माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलंय.

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या जिल्ह्यातील कोणताही नेता रवी राणाचा दुश्मन नाही. किंवा मतभेद नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी मला चहा प्यायला बोलावलं तर, मी त्यांच्या घरी जायला तयार आहे, असं रवि राणा म्हणाले आहेत.

रवि राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनभेद आणि मतभेद यात फरक आहे. मनभेद होण्यासाठी थोडा वेळ लागेल तर, चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू. नंतर चहा घेऊ. रवी राणा आणि आमचा कायमचा वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही. याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कधी आडवे आलो नाही, असंही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. त्यामुळे रवी राणा यांच्या वक्तव्यानतंर यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू या तीन नेत्यांमध्ये मैत्री होईल का? तिन्ही नेते एकत्र चहासाठी भेटतील का? अशा प्रश्नांसह राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधीनीची भूमिका

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

Nachni vs Oats Diabetes : नाचणी की ओट्स, डायबेटीजच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त सल्ला

Madhui Dixit Hair Care Tips: माधुरी दिक्षीतने काळ्याभोर केसांचं रहस्य सांगितलं, 58 व्या वर्षीही लावते फक्त या 2 गोष्टी

SCROLL FOR NEXT