रत्नागिरी भूकंपाने हादरला; कोणतीही हानी नाही! Saam Tv
महाराष्ट्र

रत्नागिरी भूकंपाने हादरला; कोणतीही हानी नाही!

रिश्टर स्केलवर तीव्रता 4.0 होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी : जिल्हा परत एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. महिन्याभरात ही दुसरी घटना घडली आहे. जिल्ह्यात साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसरात भुकंपाचे धक्के बसले आहेत. गाढ साखर झोपेत असताना भूंकप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नाही. रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. भूकंप होत असल्याचे लक्षात येताच नगरिकांनी घराबाहेर धाव घेतली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

हे देखील पहा-

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपांचे धक्के जाणावले आहेत. जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसरामध्ये या भूकंपाची तिव्रता अधिक होती. ४ रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तिव्रता नोंदवण्यात आली आहे. मुंबईपासून जवळपास ३५० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

दरम्यान या भूकंपामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हाणी झाल्याची बातमी आतापर्यंत मिळाली नाही. भूकंपाच्या घटनेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र, नागरिकांमध्ये भितीचे वातावर असल्याचे बघायला मिळत आहे. १ महिन्याच्या आत जिल्ह्याला २ वेळेस भूकंपाचा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेंबूर प्रकरणात सर्व अधिकारी निर्दोष; अधिकाऱ्यांना वाचवलं,कंत्राटदारांवर बिल फाडलं

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली

Wednesday Horoscope : कामात प्रगती होणार; 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यक्तींना पैशाची चणचण जाणवणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana: मतांसाठी लाडकीत 3,500 कोटींचा अपहार; ठाकरेसेना कायदेशीर नोटीस पाठवणार

Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

SCROLL FOR NEXT