Shreya Maskar
गाविलगड किल्ल्याला गवळीगड असेही म्हणतात. हा किल्ला अमरावती जिल्ह्यात, चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाजवळ, निसर्गरम्य सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे.
गाविलगड हा डोंगरावरील किल्ला असून तो १,०६० मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला मध्ययुगीन काळातील गवळी राजांकडून बहमनी, मराठा आणि ब्रिटिश साम्राज्यांकडे हस्तांतरित होत गेला.
गाविलगड किल्ला हा विदर्भाची शान आहे. हा १२ व्या शतकातील एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. मध्ययुगीन इतिहास, दगडी पायवाटा आणि दरीची विहंगम दृश्ये यांचा एक अनोखा संगम आहे.
गाविलगड किल्ला मूळतः १२ व्या शतकात यादव वंशातील एका स्थानिक गवळी राजाने मातीचा किल्ला म्हणून बांधला होता. त्यानंतर, १४२५ मध्ये बहमनी सल्तनतीचा नववा सुलतान अहमद शाह वली याने किल्ल्याचे दगड आणि लोखंडाचा वापर करून भक्कम तटबंदीसह पुनर्निर्माण केले.
चिखलदराजवळ सातपुडा पर्वतश्रेणीत १,१०३ मीटर उंचीवर वसलेल्या गाविलगड किल्ल्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य असे दोन भाग आहेत. येथे प्रचंड दगडी तटबंदी, बुरूज, पर्शियन शिलालेख असलेली अनेक भव्य प्रवेशद्वारे आहेत.
गाविलगड किल्ल्याजवळ अमरावती स्टेशन आहे. मुंबईहून अमरावतीपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे रिक्षाने चिखलदरापर्यंत जा. तेथून पुढे किल्ल्यापर्यंत ट्रेक प्लान करा.
श्री अंबादेवी मंदिर, थंड हवेचे ठिकाण चिखलदरा, वन्यजीवांनी समृद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्प ही सुंदर पर्यटन स्थळे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.