Ratnagiri Crude Bomb Blast Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri: गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरीत खळबळ, महिलेच्या हाताची पाचही बोटं तुटली

Ratnagiri Crude Bomb Blast: रत्नागिरीमध्ये भयंकर घटना घडली. गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका महिलेच्या हाताची पाचही बोटं तुटली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला.

Priya More
  • रत्नागिरीमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट

  • महिलेच्या हातात बॉम्ब फुटल्याची घटना

  • जांभारी फाट्यावर स्फोटामुळे खळबळ

  • रत्नागिरीत २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब सापडले

अमोल कलये, रत्नागिरी

गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरी हादरले. रत्नागिरीच्या जांभारी परीसरात ही घटना घडली. या स्फोटामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली. महिलेच्या हाताची पाचही बोटं तुटली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या जांभारी परिसरात गावठी बॉम्बचा स्फोट झाला. वाटद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रेश्मा प्रमोद सुर्वे असं जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

ही महिला जंगल परिसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांना संशयास्पद वस्तू दिसल्याने त्यांनी ती हातात उचलताच जोरदार स्फोट झाला.स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या डाव्या हाताची पाचही बोटं तुटली असून त्या गंभीर भाजल्या आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता परिसरात तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके नेमकी कुणी आणि कशासाठी ठेवली होती. याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जयगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT