Ratnagiri Dapoli Landslide Video Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri Landslide : रत्नागिरीवर निसर्ग कोपला, दापोलीत भलामोठा डोंगर खचला, धडकी भरवणारा VIDEO समोर

Ratnagiri Dapoli Landslide Video : रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यात भलामोठा डोंगर खचलाय.

Satish Daud

अमोल कलये, साम टीव्ही रत्नागिरी

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलंय. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 145.18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा खेड तालुक्यात पडला आहे. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. अशातच दापोली तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुसळधार पावसामुळे साकोली (Sakoli News) येथील डोंगराची माती भुसभुशीत झाल्याने संपूर्ण डोंगरच खचून खाली आला आहे. ही थरारक दृष्य मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की भलामोठा डोंगर काही क्षणातच खचून खाली आलाय.

दरम्यान, रत्नागिरीतील (Ratnagiri Rain News) सतत पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झालंय. पावसाचा सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसला आहे. खेडमध्ये 24 तासांत 238 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोद झाली आहे. तर मंडणगड, दापोली, चिपळूणमध्ये देखील 150 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालाय.

याशिवाय गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांमध्ये देखील 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. दुसरीकडे चिपळूणलाही मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. त्यामुळे वाशिष्टी नदीला पुर आला असून चिपळून बाजारपेठेत पाणी शिरलंय. चिपळूणचा नवा बाजारपुल देखील पाण्याखाली जातो की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

खेडजवळील दिवाणखवटी या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने (Landslide) कोकण रेल्वेसेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. परिणामी अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून रेल्वेस्थानकावर गर्दी दिसून येत आहे. सध्या प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : नवी मुंबईत भाजप आघाडीवर, शिंदेंना मोठा फटका बसणार

Valentine Day 2026 : 'व्हॅलेंटाईन डे'ला 'तिला' प्रपोज करताय? मग 'ही' गोष्ट घ्या लक्षात, नाहीतर होकार नकारात बदलेल

Furniture Design: घराच्या शोभेसाठी हे आहेत 5 स्पेस-सेव्हिंग फर्निचर डिझाईन्स

Mumbai Street Food Recipes: मुंबईत फिरायला आलात? 'हे' 5 पदार्थ एकदा खाऊन पाहाच

Jalgaon Municipal Election: शिंदेंच्या उमेदवाराने जेलमधून जिंकली निवडणूक; माजी महापौर ललित कोल्हेंसह कुटुंबातील दोघेजण विजयी

SCROLL FOR NEXT