Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: जगबुडी नदीत दोन मगरीचा मृत्यू; आत्तापर्यंत ४ मगरींचा मृत्यू

जगबुडी नदीत दोन मगरीचा मृत्यू; आत्तापर्यंत ४ मगरींचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्‍नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड (Khed) येथील जगबुडी नदीमध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृत मगरी आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. जगबुडी नदीत आतापर्यंत चार मगरींचा मृत्‍यू (Death) झाल्‍याचे समोर आले आहे.(Tajya Batmya)

जगबुडी पुलानजीक भोस्ते ते खेड (Ratnagiri News) दरम्यान सुसेरी या ठिकाणी नदीच्या पात्रात दोन मगरी विविध ठिकाणी तरंगताना आढळल्या. या संदर्भात अनेक पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. तर जगबुडी नदी प्रदूषित झाल्यामुळे मगरींच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

जगबुडी नदीच्या संवर्धनासाठी खेडमध्ये आजच मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. ही मॅरेथॉन संपल्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी मगरींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. प्रशासन आता तरी जगबुडी नदीतील प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करणार का, असा सवाल आता पर्यावरणप्रेमीं कडून विचारला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT