sourabh malushte, Ratnagiri, Water saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News : रत्नागिरीत भीषण पाणी टंचाई; युवकानं 10 लाख लिटर पुरवठा केला माेफत (पाहा व्हिडिओ)

Sourabh Malushte Supplies Free Water Tanker To Citizens: प्रशासनानं पाणी टंचाईवर ठोस मार्ग काढणं गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

अमोल कलये

Sourabh Malushte News : रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी भूजल पातळी खाली गेल्यामुळे अनेक विहरी, पाणवठे कोरडे झाले आहेत. बहुतांश भागात टँकरेने पाणीपुरवठा सुरु आहे. रत्नागिरी (ratnagiri) शहरात देखील नागरिकांना एकदिवसा आड पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरीकांचे पाण्यावीना सध्या हाल होताहेत. (Maharashtra News)

या परिस्थितीत सामाजिक भान म्हणून शहरातील सौरभ मलुष्टे (sourabh malushte) हा जलदूत बनून रत्नागिरीकरांसाठी पुढे आला आहे. साैरभने 5 मे पासून शहरातल्या विविध सोसायटींना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.

त्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून टँकर शहरभर फिरत असताे. या उपक्रमातून दिवसाला सुमारे 15 ते 20 टँकर पाणीपूरवठा हाेता. आत्तापर्यंत जवळपास 10 लाख लिटर पाणी रत्नागिरीकरांना विनामुल्य साैरभकडून पूरविले गेले आहे. पाऊस सुरु हाेईपर्यंत हा उपक्रम चालू राहणार असल्याचे सौरभ मलुष्टे याने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

या उपक्रमाबाबत साैरभ म्हणाला रत्नागिरी शहरातील जवळपास 70 हून अधिक सोसायटींना एक दिवस आड मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ज्यांना पाण्याची गरज आहे अशांची तहान भागवली जातेय. रत्नागिरी शहरात विकत देखील जिथे टॅंकर मिळत नाही तिथे आम्ही पाेहचताे. जवळपास सहा हजार लोकांची तहान या उपक्रमाच्या माध्यमातून भागवली आहे.

दरम्यान साैरभ याच्या उपक्रमाचे नागरिकांकडून काैतुक हाेत आहे. या उपक्रमामुळे पाण्याची चिंता मिटल्याचे साम टीव्हीशी बाेलताना शमिका पाटील यांनी नमूद केले.

वाढते शहरीकरण आणि त्यामुळे होणारी वृक्षतोड परिणामी जलसाठे नष्ट होऊ लागलेत. त्यामुळे शहरी भागातील नागरीकांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. भुजल पातळी खाली गेल्यानं मर्यादीत पाणीपुरवठा केला जातोय. पाणीटंचाईची समस्या भेडसावणा-या रत्नागिरीकरांसाठी सौरभ मलुष्टे यांसारखे जलदूत पुढे येण गरजेचे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

SCROLL FOR NEXT