Khed Krushi Utpanna Bazar Samiti Chairman Election News : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (khed apmc) सभापती पदाच्या निवडणूकीत आमदार दिलीप मोहिते पाटलांना संधी द्या अशी आग्रह मागणी होत असताना मोहिते पाटलांनी सभापती होण्यास नकार दिल्याने थेट अजित पवारांनी खेड बाजार समितीच्या निवडणूकीसाठी पक्ष निरिक्षक म्हणुन दिगंबर दुर्गाडे यांना पाठवत, त्याला निट विचारलं का असं दादांनी पक्ष निरिक्षकाला ठणकावुन विचारले. त्यानंतर सभापती आणि उपसभापती पदासाठी उमेदवारांची निवड सुचवली. त्यानुसार आजची मतदान प्रक्रिया पार पडली. (Maharashtra News)
खेड कृषी उत्पन्न बाजारसमितीत NCP ला पुर्ण बहुमत असतानाही भाजपासह सर्व पक्षीयांकडुन NCP ला आव्हान देत सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक लावली गेली. यामुळे मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट लक्ष घालत ही निवडणूक पार पाडली.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (mla dilip mohite patil) यांच्यासह 10 आणि अपक्ष 1 असे संख्याबळ असुनही विरोधातील भाजपाकडे (bjp) सर्वपक्षीय 6 आणि अपक्ष 1 असे बलाबल बाजार समितीत आहे. दरम्यान या निवडणूकीसाठी पक्षनिरिक्षक म्हणुन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसमधील सभापती पदावर आमदार मोहिते पाटील यांना संधी द्यावी अशी आग्रही मागणी संचालकांकडुन करण्यात आली. मात्र दिलीप मोहिते पाटील यांनी पद घेण्यास नकार दिला.
तरीही निरिक्षक दुर्गाडे यांना अजित पवारांनी अगदी ठणकावत त्याला निट विचारलंय का असं म्हणत अजित पवारांनी सभापती पदासाठी कैलास लिंभोरे तर उपसभापती पदासाठी विठ्ठल वनघरे यांची नावे जाहिर केली.
लिंभोरे- वनघरे यांना प्रत्येकी ११ संचालकांची मते मिळाली. तर विरोधी गटाच्या विजय शिंदे यांनी सभापती पदासाठी तर सुधीर भोमाळे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यांना त्यांच्या पॅनेल मधील ७ संचालकांनी मतदान केले. अजित पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नाराजी असल्याची दबक्या आवाजातील चर्चेला पुर्णविराम मिळाला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.