Ratnagiri News Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : मंदिरातून सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले; रत्नागिरीत श्रीराम मंदिरात चोरी

Ratnagiri News : रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर सकाळी मंदिरात आलेल्या भाविकांना सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचे दिसले. यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिर व्यवस्थापनाने पोलिसात खबर दिली

Rajesh Sonwane

अमोल कलये 

रत्नागिरी : मंदिरातील दानपेट्या तसेच देवाच्या अंगावरील आभूषणे चोरी केल्या जात असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. अशात रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील श्रीराम मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरी करण्यात आली असून चोरट्यांनी सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

रत्नागिरी शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या मुख्य बाजारपेठ परिसरात श्रीराम मंदिर आहे. याच मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत चोरी केली आहे. मंगळसूत्र चोरताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान सकाळी मंदिरात आलेल्या भाविकांच्या हा प्रकार लक्षात आला. चोरीचा प्रकार उघड होताच एकच खळबळ उडाली. चोरीप्रकरणी मंदिर व्यवस्थापनाने शहर पोलिसात खबर दिली आहे. 

पोलिसांकडून तपास सुरु 

पोलिसानी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी पोलीस पथके गठीत करण्यात आली आहेत. चोरटा लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल; असा विश्वास शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी व्यक्त केला आहे. चोरटा सीसीव्हीमध्ये कैद झाला असून त्याअनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

सराईत गुन्हेगारांची काढली धिंड 

नाशिकरोड पोलिसांनी सराईत गुन्हेगार आणि समर्थकांची धिंड काढली आहे. संशयित गुन्हेगार चिमण्याचे जेल बाहेर येताच सेलिब्रेशन केले होते. संशयित गुन्हेगार जेलबाहेर येताच समर्थकांनी जेलच्या गेटवरूनच मिरवणूक काढली. मिरवणुकीचे रिल्स सोशल मीडियावर टाकले, रिल्स व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाला खडबडून जागे झाले. रिल्समधून आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी जिथून मिरवणूक काढली तिथूनच शहरात काढली गुन्हेगार आणि समर्थकांची धिंड काढत पोलिसी खाक्या दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: फडणवीस सरकारचे ५ मोठे निर्णय, कॅन्सरच्या उपचारासाठी उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर...

Sanskruti Balgude: क्लासी लूक अन् बोल्ड अदा,संस्कृतीला पाहून पब्लिक झाली फिदा

Bigg Boss 19 च्या घरातील नात्यांची समीकरण बदलले, एकदम 8 सदस्य झाले नॉमिनेट

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतील

Pimpri chinchwad : शेअर मार्केटच्या नावाखाली ६४ लाखात फसवणूक; टोळी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT