Pandharpur : रखडलेल्या रस्त्यासाठी आजी माजी सरपंचाचे खड्ड्यात बसून आंदोलन; प्रशासनाचा केला निषेध

Pandharpur News : ग्रामसडक योजनेंतर्गत काम मंजूर होऊन निधी प्राप्त झाला. रस्त्याच्या कामाच्या निविदाही पूर्ण झाल्या आहे. परंतु संबंधीत ठेकेदाराने मागील एक वर्षापासून काम सुरु केले नाही 
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : मागील एक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे; या मागणीसाठी कान्हापुरीतील (ता.पंढरपूर) येथील आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात बसून आंदोलन केले आहे. ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरु न केल्यास संबंधीत ठेकेदाराच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल; असा इशारा येथील माजी सरपंच प्रेम चव्हाण यांनी दिला आहे.

पंढरपूर तालुक्यातील कान्हापूरी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्य देखील आंदोलनात सहभागी झाले होते. माजी आमदार बबन शिंदे यांच्या प्रयत्नातून येथील चव्हाण वस्ती ते कान्हापूरी या अडीच किलोमीटर अंतर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या कामाच्या निविदाही पूर्ण झाल्या आहे. परंतु संबंधीत ठेकेदाराने मागील एक वर्षापासून काम सुरु केले नाही. 

Pandharpur News
Satara Breaking News : कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

निधी मंजूर असूनही कामाकडे दुर्लक्ष 

या मार्गावरून शाळेचे विद्यार्थी, नागरिक, महिला यांना चिखाल तुडवत यावे जावे लागते. शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर असूही काम सुरु होत नसल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदाराचे कामाकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज येथील ग्रामस्थांनी रस्त्त्यावर पडलेल्या खड्यातील पाण्यात बसून आंदोलन केले.  

Pandharpur News
Success Story: आधी डॉक्टर मग IAS; पालघरच्या निर्भीड अन् कडक शिस्तीच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड आहेत तरी कोण?

दरम्यान रस्त्याचे रखडलेले काम ताडीने सुरु करावे; या मागणीसाठी आज येथील आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यानीच रस्त्यावर पडलेल्या खड्यामधील पाण्यात बसून ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. आंदोलनामध्ये सरपंच कोमल शिंदे, माजी सरपंच प्रेम चव्हाण, बालाजी फराडे, राणी फराडे, उपसरपंच गोकुळा पाटील, माजी उपसरपंच महेबुब देशमुख, अनिल फराडे, दत्तात्रय शिंदे, दयानंद पाटील, भगवान फराडे, सुधीर चव्हाण, बापु मोहिते, गणेश ढोबळे आदी सहभागी सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com