mrstc employee strike 
महाराष्ट्र

कोकणातील १६० बसेस बंद; नागरिकांसह पर्यटकांचे हाल

अमोल कलये

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि मंडणगड या दोन्ही एसटी डेपोतील कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन आज (सोमवारी) सकाळपासून सुरू केले आहे. त्यामुळे येथून सर्वच ठिकाणी जाणारी बस सेवा ठप्प झालेली आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरू झालेत. msrtc employee strike guhaghar kokan news

संपात मंडणगडमध्ये ४०, गुहागरमधील ६० आणि राजापूरमधील ६० अशा १६० बसेस बंद आहेत. जिल्ह्यातील इतर डेपोत बस सेवा अंशकालीन सुरु आहे. जवळपास ४० टक्के फे-या या बंद झाल्याने आंदोलनाचा थेट फटका सामान्य प्रवासी वर्गाला बसला आहे.

या आंदाेलनामुळे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करु लागले आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. आता जिल्ह्यात सगळीकडे हे आंदोलन सुरू झाल्यास ऐन दिवाळी सुट्टीत प्रवासी, महिला, लहान मुले यांचे आतोनात हाल होणार असं चित्र दिसत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT