Pandharpur 4 youths from drowned in Ganpatipule sea Saam TV
महाराष्ट्र

Ganapatipule Beach : मोठी बातमी! गणपतीपुळेच्या समुद्रात पंढरपुरातील ४ तरुण बुडाले

Ratnagiri Breaking News : गणपती पुळे येथील समुद्रात पंढरपूर येथील ४ तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.

Satish Daud

कोकणातील गणपतीपुळे परिसरात पर्यटनासाठी आलेले चार तरुण बुडाले. या दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागला. अन्य तिघांना वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं. ही दुर्देवी घटना रविवारी (ता. २ जून) दुपारच्या सुमारास घडली. अजित धनाजी वाडेकर, असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हे सर्व तरुण पंढपूर येथील रहिवासी असल्याचं कळतंय.

अजय बबन शिंदे ,आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ दत्तात्रय माने, अशी वाचण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे चौघे मित्र पंढरपूर येथून गणपती पुळे येथे पर्यटनासाठी आले होते. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास ते समुद्रातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अजित हा पाण्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागला. त्याला बुडताना पाहून इतर मित्रही खोल पाण्यात उतरले. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले. चार तरुणांना बुडताना पाहून इतर पर्यटकांनी आरडाओरड सुरू केली.

तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ पाण्यात उड्या घेतल्या. अथक प्रयत्नानंतर चारही तरुणांना पाण्याबाहेर काढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं. मात्र, यातील अजितच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मारुती पंडित कराळे, असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती आणि त्याचे मित्र रविवारी सकाळी पोहण्यासाठी हर्सुल तलावात गेले होते. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे मारुतीचा तलावात बुडून मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपा विषारी सापासारखा, त्याला मारून टाका; मल्लिकार्जुन खरगे यांची जहरी टीका

Beed Politics : बीडचं राजकारणच वेगळं; मुलाच्या विरोधात प्रचारासाठी वडील उतरले मैदानात

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

SCROLL FOR NEXT