Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड अन्...; शिंदेसेनेच्या नेत्यावर आरोप

Sangli Political News: सांगलीमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला. शिंदेसेनेच्या उमेदवाराने हा हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या उमेदवाराने केला आहे. घराची आणि घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.
Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड अन्...; शिंदेसेनेच्या नेत्यावर आरोप
Sangli PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान तणाव वाढला

  • भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली

  • शिंदेसेनेच्या उमेदवारावर हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे

  • घटनेचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विजय पाटील, सांगली

सांगली महापालिका निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये अर्ज माघारी घेण्यावरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजप उमेदवाराच्या मुलाने केला आहे. शिंदेसेनेच्या उमेदवाराने मात्र आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सांगलीत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या मिरजमध्ये भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपा उमेदवार सुनीता व्हनमाने यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांना व्हनमाने यांच्या घरावर हल्ला करत त्यांचा मुलगा संदीप व्हनमाने यांच्यावर देखील हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी व्हनमाने यांच्या घरासमोर असणाऱ्या कार आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली.

Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड अन्...; शिंदेसेनेच्या नेत्यावर आरोप
Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे पॅनलचे उमेदवार सागर व्हनखंडे यांच्या समर्थकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप संदीप व्हनमाने यांनी केला आहे. मात्र संदीप व्हनमाने यांनी केलेले आरोप शिंदेसेनेचे उमेदवार सागर वानखडे यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहानुभूती मिळवण्यासाठी विरोधकांनी असे बिनबुडाचे आरोप केल्याचा आरोप वानखडे यांनी केला. तोडफोड करणाऱ्या संशयितांसोबत त्यांचे पूर्वीचे वाद असून या वादातून हा प्रकार घडला आहे. यामध्ये माझा काहीही संबंध नसल्याचे शिंदेसेनेचे सागर वनखंडे यांनी सांगितले.

Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, वाहनांची तोडफोड अन्...; शिंदेसेनेच्या नेत्यावर आरोप
Nashik Politics: सुधाकर बडगुजरांच्या घरात 3 जणांना उमेदवारी; भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com