Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं

Nagpur BJP Former Mayor Archana Dehankar: नागपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या नवऱ्याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाराज झालेल्या अर्चना यांनी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.
Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं
Nagpur BJP Former Mayor Archana DehankarSaam Tv
Published On

Summary -

  • नागपूर महानगरपालिका निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड

  • भाजपने उमेदवारी नाकारल्याने विनायक डेहनकरांची बंडखोरी

  • पक्षनिष्ठेसाठी अर्चना डेहनकरांनी नवऱ्याचे घर सोडले

  • माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करण्याचा केला निर्धार

पराग ढोबळे, नागपूर

नागपूर महानगर पालिका निवडणुकीदरम्यान एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपमधील बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकर यांचा घरी पाहायला मिळत आहे. नवऱ्याने पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे नाराज झालेल्या अर्चना डेहनकर यांनी चक्क नवऱ्याचे घर सोडले असून त्या माहेरी भावाचा घरी निघून गेल्या. नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये नवरा ऐकत नसल्यामुळे माजी महापौर चक्क माहेरी गेल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नागपूरच्या प्रभाग क्रमांक १७ मधून माजी महापौर अर्चना डेहनकर यांचा नवरा विनायक डेहनकर यांनी उमेदवारी मागितली होती. मागच्या वेळी देखील त्यांनी उमेदवारी मागितली होती. पण त्यांना ती नाकारण्यात आली. यावेळी सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पण त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने भाजपच्या एखाद्या सदस्याला उमेदवारी न देता थेट काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिली. त्यामुळे विनायक डेहनकर यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं
Nagpur: प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं ५० व्या वर्षी निधन, वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षनिष्ठा आणि नवऱ्याचा निर्णय या कात्रीत सापडल्याने अर्चना डेहनकर यांनी देखील मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवऱ्याचे घर सोडले आणि नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करण्याचा निर्धार त्यांनी केला. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. २००९ ते २०१२ दरम्यान भाजपमुळे महापौरपद मिळाल्याने पक्षाच्या विरोधात जाणे अर्चना डेहनकरांना अमान्य असल्याने त्यांनी नवऱ्याचे घर सोडत नागपुरमधील माहेरी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं
Nagpur : सकाळी काँग्रेसची साथ सोडली, रात्री भाजपातून उमेदवारीचा अर्ज भरला; नागपुरात राजकारण ३६० डिग्री फिरलं!

अर्चना डेहनकर यांनी यासंदर्भात सांगितले की, 'बायको म्हणून मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. भाजपचा झेंडा जरी खाली पडला तर त्यांना सहन होत नव्हता इतकी त्यांची पक्षनिष्ठा होती. मात्र असं असताना काँग्रेसमधून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली. उमेदवारी मागेपर्यंत मी त्यांच्या पाठीशी होते. मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांना समजावून सांगितले तरी देखील ते ऐकत नसल्यामुळे मी घर सोडून माहेरी निघून आली.'

Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं
Nagpur: नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले, उमेदवारी न मिळाल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांचा राडा; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com