Manasvi Choudhary
लग्नात नवरीसाठी लाल साडी खरेदी केली जाते. लाल रंगाच्या साडीमध्ये नवरीचं सौंदर्य खुलून येते.
लाल रंगाच्या साडीमध्ये सुद्धा अनेक पॅटर्न्स आहेत तुम्ही लग्नसमारंभासाठी खास अशाप्रकारे लूक करू शकता.
लाल रंगाची बनारसी साडी अत्यंत सुंदर दिसते. बनारसी साडीवर तुम्ही हेव्ही दागिने देखील परिधान करू शकता.
लाल रंगाची टिश्यू सिल्क साडी सध्या सर्वात ट्रेडिंगमध्ये आहे. लाल रंगात ही साडी अतिशय रॉयल आणि चकाकणारी दिसते.
ऑर्गेन्झा लाल साडी पण हलकी आणि स्टायलिश असते. लाल ऑर्गेंझा साडीवर पांढऱ्या किंवा सोनेरी धाग्यांचे फ्लोरल एम्ब्रॉयडरी किंवा हाताने वर्क केलेले असते.
लग्न संध्याकाळी असल्यास तुम्ही सिक्विन लाल साडी ट्राय करू शकता. यावर स्टायलिश ब्लाऊझ देखील निवडू शकता. पूर्ण लाल साडीवर बारीक टिकल्यांचे वर्क केलेले असते.
लग्नासाठी पैठणी साडी हवी असल्यास तुम्ही लाल रंगाची मोर आणि पोपटाची नक्षी असलेली साडी निवडू शकता.