Manasvi Choudhary
मंगळसूत्र हा स्त्रियांच्या सौंभाग्याचे प्रतीक आहे. लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.
पूर्वी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र त्यात दोन वाट्या असे होते मात्र आता यामध्ये अनेक बदल झाले आहेत. मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत.
दोन वाट्यांचे मंगळसूत्र हे पारंपारिक डिझाईन आहे. पण आता या वाट्यांऐवजी अनेक डिझाईन्सचे मंगळसूत्र पेंडट मिळतात.
फुले, पानांच्या आकारातील पेंडट महिलां मंगळसूत्रामध्ये खास बनवून घेतात. हे पेंडट असलेले मंगळसूत्र पूजा, लग्नसमारंभात काठपदरी साडीवर खास उठून दिसतात.
सोन्याच्या चैनमध्ये नाजूक छोटा हिरा असे मंगळसूत्र महिलांना कम्फर्टेबल वाटते. ऑफिस वेअर, कुर्ती, जिन्स वर हे अधिक शोभून दिसते.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्वत:चे किंवा पतीच्या नावाचे पेडंट बनवून घेऊ शकता. हे मंगळसूत्र युनिक स्टाईल वाटते.
ज्यांना थोडे जड आणि पारंपरिक दागिने आवडतात, त्यांच्यासाठी लक्ष्मीची प्रतिमा किंवा नाजूक कोरीव काम असलेले टेम्पल पेंडंट घालू शकता.