Bhaskar Jadhav Emotional housemade daughter supriya Marriage Saam Tv News
महाराष्ट्र

घरकाम करणाऱ्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांचा कंठ दाटला, बापमाणसाला बघून ग्रामस्थही गहिवरले

Bhaskar Jadhav Emotional in Marriage : आज सुप्रियाचं लग्न होतं. इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले.

Prashant Patil

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव आपल्या घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात भावूक झाले असल्याचं पाहायला मिळालं आहे. गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी त्यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होती. पण, तिचा स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकलं आणि आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचं लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवलं होतं. आपल्या पोटच्या लेकीची पाठवणी करताना जसं बापाच्या डोळ्यात पाणी येतं अगदी तसेच मानलेल्या लेकीची पाठवणी करताना जाधवांच्या डोळ्यात पाणी तरळले.

आज सुप्रियाचं लग्न होतं. इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं, सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेलं तेव्हा भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने त्यांची पत्नी सुवर्णाताई आणि सून स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि रडू लागली तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही वेळाने स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितलं, 'सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.'

भास्कर जाधव हे स्वभावाने अतिशय कडक आहेत, अनेकदा राजकीय मंडळींनाही त्यांचा प्रत्यय आलेला आहे. प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली, कोण वावगे वागले तर ते रोखठोकपणे बोलतात. मग ती व्यक्ती बाहेरची कोणी असो वा घरातली, त्याचा ते विचार करत नाहीत. ते कणखर आहेत, पण तेही किती हळवे आहेत हे आजच्या प्रसंगाने सर्वांसमोर आले. त्यामुळेच, सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही, जातीतली सुद्धा नाही. तरीदेखील वडील बनून ते तिच्या पाठीशी राहिले, हा त्यांचा विचार आणि कृती ग्रामस्थांना भारावून टाकून गेली. भास्कर जाधवांच्यात दडलेला बापमाणूस पाहून गावकरीही गहिवरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT