Mango Businessman Death Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri: प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्याची आत्महत्या, स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; रत्नागिरी हादरली

Mango Businessman End Life: रत्नागिरीमध्ये प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्याने आत्महत्या केली. राहत्या घरी त्याने स्वत:वर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.

Priya More

Summary -

  • रत्नागिरीत आंबा व्यापाऱ्याची आत्महत्या

  • स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं

  • आर्थिक ताण आणि आजारपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

  • रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

अमोल कलये, रत्नागिरी

प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली. राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून या व्यापाऱ्याने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील ताणदे गावात ही घटना घडली. रुपेश नागवेकर असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव होते. रुपेश यांनी राहत्या घरी बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली. बंदुकीच्या आवाजाने आसपासचा परिसर हादरून गेला. गोळीचा आवाज ऐकून घरातील सर्वांनी रुपेश यांच्या खोलीकडे धाव घेतली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गोळी लागून जास्त रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

रुपेश नागवेकर हे रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यापारी होते. आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून रुपेश त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी रुपेश नागवेकरचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावर पोलिस पुरावे शोधत आहेत. पोलिसांना सुसाईड नोट देखील सापडली नाही. रुपेश यांच्या आत्महत्येमुळे नागवेकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे ताणदे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या ४ ठिकाणी दान केल्याने वाढते श्रीमंती, चाणक्यनितीतले महत्त्वाचे विचार नक्कीच वाचा

नाशिक हादरलं ! प्रियकराच्या मदतीनं महिलेनं लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराला संपवलं; नंतर कसारा घाटात फेकला मृतदेह

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे गटाचा दावाच खोटा ठरणार? २१ जूनच्या 'त्या' घटनेवरून सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात घणाघात

Maharashtra News Live Update: सचिन अंदुरे जामीन प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुप्रीम कोर्टात जाणार

Cabinet Decisions : फडणवीस सरकारचे १० महत्वाचे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना काय मिळणार?

SCROLL FOR NEXT