Ratnagiri News  Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri : मुले पळवणारी समजून महिलेला बेदम मारहाण; रत्नागिरीतील धक्कादायक घटना

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी, साम टिव्ही

Ratnagiri News : कॅन्सरने आजारी असलेल्या मुलासाठी आर्थिक मदतीची मागणी करणाऱ्या महिलेला मुले पळवणारी महिला असल्याच्या गैरसमजातून राजीवडा-कर्ला येथील महिला पालकांच्या जमावाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी मेस्त्री हायस्कुलमध्ये (Ratnagiri) घडली. सारिका धुमाळ (29, मुळ रा. परभणी सध्या रा. खेडशी, रत्नागिरी) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. (Ratnagiri News Today)

सारिका धुमाळ यांचा मुलगा खेडशी येथे आजारी असून उपचारांसाठी मदत मिळवण्याच्या अपेक्षेने त्या हायस्कुलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी शाळेतील प्राथमिक वर्गाजवळ गेल्या असता तेथे पालकांची सभा सुरू होती. सारिका यांना पाहून पालकांनी ही महिला कोण आणि इथे कशी आली? अशी विचारणा शाळेतील शिक्षकांकडे केली. (Latest Marathi News)

शिक्षकही या सर्व प्रकाराने गोंधळून गेले होते. दरम्यान, पालकांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंवर विश्वास ठेवून ही महिला मुले पळवण्यासाठीच शाळेत आली असल्याचा गैरसमज करुन राजीवडा आणि कर्ला येथील इतर पालकांना फोन करुन बोलावून घेतले. (Maharashtra News)

काही वेळातच शाळेत 50 ते 100 पालक जमा झाले. त्यातील महिला पालकांनी त्या महिलेला मारहाण केली. त्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी मध्यस्थी करत महिलेची पालकांपासून सुटका करुन तिला वैद्यकिय मदत देउन शहर पोलिसांच्या हवाली केले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT