RATNAGIRI BRUTAL MURDER CASE: YOUTH KILLED IN SICKLE ATTACK, THREE ACCUSED DETAINED Saam tv
महाराष्ट्र

Shocking : रत्नागिरीत खळबळ! मुंबईहून कामानिमित्त गावी गेलेल्या तरुणाची हत्या

Ratnagiri Crime News : रत्नागिरीतील साईनगर परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • रत्नागिरीतील साईनगरमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला

  • उपचारादरम्यान सूरज झोरेचा मृत्यू

  • तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

  • हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

  • परिसरात भीती आणि नागरिकांमध्ये संताप

अमोल कलये, रत्नागिरी

रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. शहराजवळील कुवारबाव साईनगर परिसरात सात बंगल्याच्या मागील भागात एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव सूरज राजाराम झोरे असे असून तो मूळचा संगमेश्वर तालुक्यातील रहिवासी होता. सध्या तो मुंबईत वास्तव्यास होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. गुरुवार, २१ मे रोजी रात्री साडेनऊ ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. साईनगरमधील सात बंगल्याच्या मागील परिसरात संशयित तिघांनी मिळून सूरजवर कोयत्याने मानेवर आणि हातांवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी, २२ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी तत्काळ हालचाली करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख उर्फ सोनू अशी त्यांची नावे आहे. या तिघांकडून पोलिस कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, मृत सूरज झोरेची बहीण नंदा रमेश फाळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: टिटवाळा हादरले! भाचीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, संतापलेल्या ३ तरुणांकडून मामाची हत्या

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय गंभीर जखमी

मुंबईत भीक मागत फिरणारा ‘भावी डॉक्टर’ पोलिसांमुळे पुन्हा कुटुंबाच्या कुशीत

संतापजनक! रात्री रस्त्यावर अर्धनग्न फिरत होता तरूण; फुटपाथवरील भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, सीसीटीव्हीत घटना कैद

Mouth Cancer: सिगारेट न ओढणाऱ्यांमध्येही वाढतोय तोंडाचा कॅन्सर; तरूणांनी या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नये

SCROLL FOR NEXT