RATNAGIRI SHOCKER: DAUGHTER-IN-LAW ALLEGEDLY ASSAULTS 71-YEAR-OLD MOTHER-IN-LAW OVER PADDY SOWING WORK IN CHIPLUN Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात भात पेरणीच्या कामासाठी लवकर उठवल्याच्या कारणावरून सुनेने ७१ वर्षीय सासूला लाकडी फळीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात सासू-सुनेतील वादाने हिंसक वळण घेतले

  • भात पेरणीच्या कामासाठी लवकर उठवल्यामुळे वाद

  • सुनेने लाकडी फळीने मारहाण केल्याचा आरोप

  • सुनेवर गुन्हा दाखल

कुटुंब म्हटलं की, भांडण ही होतातच. मात्र या भांडणांनी रौद्र रूप धारण केले तर जीवित हानी होऊ शकते. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली आहे. सध्या भात पेरणीचा हंगाम सुरु असून कोकणातल्या वाड्यांमध्ये भात पेरणीला सुरुवात झाली आहे. अशातच सासूने सुनेला शेतातील काम करण्यासाठी सकाळी लवकर उठवले. याचाच राग मनात धरून सुनेने सासूला अमानुष मारहाण केली. तसेच शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत सुनेविरोधात तक्रार दाखल केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रेहेळ-गावणवाडी येथे घडली आहे. या गावात रहिवासी असलेले नाचरे कुटुंबातील सुवर्णा नाचरे (वय ७१) यांनी आपली सून मयुरी नाचरे हिला सकाळी लवकर उठून शेतातील पेरणीच्या कामात मदत करायला सांगितली.

सासूवर भीषण हल्ला

मात्र झोपेतून उठवल्यामुळे मयुरी संतापली आणि दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानंतर सुनेने सासूला अपशब्द आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर रागाच्या भरात मयुरीने घरातील चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फळीने सासूवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सुनेला शिक्षा

या मारहाणीत सुवर्णा नाचरे जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. सुवर्णा नाचरे यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी मयुरी दर्शन नाचरे हिच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT