RATNAGIRI ST BUS ACCIDENT: 11 STUDENTS INJURED AFTER HEAD-ON COLLISION OF TWO BUSES Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या २ ST बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी

Ratnagiri ST Bus Accident News : रत्नागिरीतील शिळ गावाजवळ दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन ११ विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Alisha Khedekar

  • रत्नागिरीतील शिळ गावाजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक

  • या अपघातात ११ विद्यार्थी जखमी

  • जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

अमोल कलये, रत्नागिरी

मुंबईतील चेंबूर परिसरात शाळेच्या बसवर झाड पडून १ तरुणाचा मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच रत्नगिरीत महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल ११ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रत्नगिरीत शिळ गावाच्या हद्दीत दोन एसटी बस समोरून येत असताना त्यांची जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने मदतकार्य केले.

या अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार सुरू केले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार मौन आंदोलन

Budget international travel: बजेट कमी आहे? नो टेन्शन! या ठिकाणी करून शकता इंटरनॅशल ट्रिप

Labour Code Explained: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार, Full & Final आणि कर्मचाऱ्यांचे हक्क एका क्लिकमध्ये समजून घ्या

Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे

शेतकरी कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, बँक खात्यात कधीपर्यंत येणार पैसा? सरकारनं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT