रत्नागिरी : जैतापूर मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो महामार्गावरून खाली उतरल्याने पलटी झाला आहे. या अपघातात सहा महिला गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील वाहन धारकांनी गाड्या थांबवत मदतकार्य केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर हा अपघात घडला आहे. दरम्यान वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठार दिशेने महिलांचा घेऊन टेम्पो निघाला होता. यावेळी समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यात टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेला. यामुळे टेम्पोमधील सर्व महिला मजूर दूरवर फेकल्या गेल्या.
जखमीत लहान मुलीचा समावेश
या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तर अपघातात टेम्पो चालक आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर काहींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बस झाडावर आदडल्याने अपघात
नाशिक येथून मालेगावकडे जाणारी मुरबाड डेपोची बस मालेगावकडे जात असताना मुंबई- आग्रा महामार्गावरील उमराणे गावापासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर जाऊन आदळली असून या बसमधील २८ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.