Nandurbar Crime : किरकोळ वादातून मारहाण; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Nandurbar News : अगदी क्षुल्लक कारणावरून हातापायी करण्यावर उतरत असल्याचे पाहण्यास मिळत असते, अशाच प्रकारे नंदुरबारमध्ये किरकोळ वादातून बेदम मारहाण करण्यात आल्याने तरुणाला जीव गमवावा लागला आहे
Nandurbar Crime
Nandurbar CrimeSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार शहरात किरकोळ वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. यात सदर युवक गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मात्र शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून, संतप्त जमावाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौकात सदरची घटना घडली होती. यात मोहित राजपूत असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. किरकोळ कारणावरून तरुणाचा काही मुलांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात मोहित राजपूत हा गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला सुरतमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. 

Nandurbar Crime
Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

पोलिसांना घेराव घालत आरोपींच्या अटकेची मागणी 

दरम्यान मोहितच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. मोहितचा मृतदेह घरी आणल्यावर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने शहरातील सिद्धिविनायक चौकात गर्दी केली. तसेच पोलिसांना घेराव घालून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्याचबरोबर, नंदुरबार शहरात वाढलेल्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

Nandurbar Crime
Accident : घराचा स्लॅब टाकताना अनर्थ घडला; १४ मजुरांना विजेचा झटका, मजूर मुलाचा मृत्यू

पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल 
दरम्यान पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच लवकरच सर्व आरोपींना पकडून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी दिले आहे. या घटनेमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com