Rats Glue Traps Saam TV
महाराष्ट्र

Rats Glue Traps: पेटाचा महत्वपूर्ण निर्णय; उंदीर पकडण्यासाठीचा ग्ल्यू ट्रॅप होणार बंद

Rats Glue Traps Banned: ग्लू ट्रॅपमुळे आतापर्यंत फक्त उंदीर नाही तर साप, सरडे देखील अडकले आहेत.

Ruchika Jadhav

Rats killing Glue Traps Banned:

घरात उंदीर जास्त झाल्यावर त्यांना पकडण्यासाठी अलिकडे ग्ल्यू ट्रॅप वापरण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. मात्र ग्ल्यू ट्रॅपमुळे फक्त उंदीर नाही तर अन्य प्राण्यांना देखील त्रास होत आहे. ग्लू ट्रॅपमुळे आतापर्यंत फक्त उंदीरच नाही तर साप, सरडे देखील अडकले आहेत. त्यामुळे या ग्लू ट्रॅपबाबत पेटाने (People for the Ethical Treatment of Animals) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

उंदीर पकडण्यासाठी अनेक ठिकाणी ग्ल्यू ट्रॅप वापरले जातात. यात उंदीर चिकटतात आणि अडकतात. पण या ग्ल्यू ट्रॅपवर आता बंदी येणारे. कारण अनेक जण उंदीर पकडण्यासाठी हा ग्ल्यू ट्रॅप लावतात आणि त्यात इतर प्राणी अडकतात. या ग्ल्यू ट्रॅपमध्ये साप, सरडे इतकंच काय घुबडही अडकल्याच्या घटना घडल्यात. पेटाने यांसंबंधी तक्रार केली होती, त्यानुसार सरकारने या ग्ल्यू ट्रॅपवर बंदी घातलीये.

पेटाने याबाबत म्हटलं की, प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, 1960 च्या कलम 11 चे ग्लू ट्रॅप उल्लंघन करतो. ग्लू ट्रॅपला असलेला गम जास्त प्रमाणात चिकट असतो. उंदीर जेव्ह यामध्ये अडकतो तेव्हा त्यातून निखने त्याला कठीण होते. परिणामी उंदीर तेथे मरतात. तसेच अन्य प्राणी देखील ग्लू ट्रॅपमध्ये अडकून मृत्यू वापत आहेत.

उंदीर पकडण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय उपलब्ध आहेत. त्यामुळे ते पर्याय वापरून उंदीर पकडावेत. उंदीर पकडण्यासाठी मिळणाऱ्या लाकडी पिंजऱ्याचा वापर करावा. ग्लू ट्रॅपमध्ये सापांसह पक्षी देखील चिकटतात. पक्षांपासून माणसाला काही त्रास नसतानाही अनेक पक्षी या ग्लू ट्रॅपला अडकलेत. त्यामुळे ग्लू ट्रॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT