महाराष्ट्र

सरपंचबाईंच्या पतीराजांनीच चोरले पाणी योजनेचे पाईप

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कर्जत तालुक्यात राशीन ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय नेत्यांचा अट्टहास असतो. देशमुख आणि राजेभोसले गटात येथे नेहमीच चढाओढ असते. या ग्रामपंचायतीवर देशमुख गटाच्या नीलम साळवे या सरपंच आहेत.

ही ग्रामपंचायत वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कर्जत-राशीन संयुक्त पाणीयोजनेचे पाइप चोरीला गेले आहेत. त्या प्रकरणाच्या तपासात सरपंच पतींचे नाव समोर आल्याने गहजब सुरू आहे. या बाबत विरोधी राजेभोसले गटाचे नेते राम कानगुडे व विक्रम राजेभोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन तसे आरोप केले आहेत. यावेळी माजी उपसरपंच शाहू राजेभोसले, तात्यासाहेब माने, अशोक जंजिरे आदी उपस्थित होते. Rashin's sarpanch's husband accused of theft

कानगुडे व राजेभोसले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जितेंद्र गजरमल व प्रल्हाद साळवे या आरोपींना अटक झाली आहे. त्यांनी सरपंच नीलम साळवे यांचे पती भीमराव साळवे हे मुख्य सूत्रधार असल्याचा कबुलीजबाब दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही जनतेची फसवणूक आहे. अशा स्वरूपाचे पत्रक ग्रामपंचायत सदस्य हर्षदा जंजिरे, अॅड. युवराज राजेभोसले, बापू उकिरडे, जनाबाई सायकर यांनी काढले आहे.

सरपंच साळवे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवून माझे पद त्यांना घालवायचे आहे. परंतु त्यांना यात यश मिळणार नाही. आणि राजीनामाही देणार नाही.Rashin's sarpanch's husband accused of theft

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Sign: बस्स! एका नजरेने घायाळ करतात या राशींच्या मुली

Uddhav Thackeray :...म्हणून तुळजा भवानीला साकडं घातलंय; विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया,VIDEO

भारताशिवाय Champions Trophy होऊच शकत नाही.. PCB ला धडा शिकवण्यासाठी ICC ने उचललं मोठं पाऊल

Hitendra Thakur: भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला पैसे वाटपाची माहिती दिली, हितेंद्र ठाकूर यांचा आरोप

International Men's Day: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन १९ नोव्हेंबरला का साजरा केला जातो, त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT