औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ अहीर मासा. 
महाराष्ट्र

जायकवाडीत सापडलेल्या माशावर का लागली एवढी बोली...

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः घोरपडीत औषधी गुणधर्म असतात. गांडुळामुळे धनसंपत्ती मिळते...अशा किती तरी अफवा समाजात आहेत. त्या किती खऱ्या, किती खोट्या हे देव जाणो. परंतु त्यापायी प्राण्यांची तस्करी मात्र वाढली आहे. असाच किस्सा आहे माशांबाबत. अहीर नावाच्या माशाला हजारोंची बोली लागते. हा मासा नव्हे तर संजीवनी असल्यासारखे त्यावर खवय्ये तुटून पडतात. जायकवाडी जलाशयात सापडलेल्या माशाबाबतही असेच झाले. हजार...दोन हजार अशी करता करता बोली २५ हजारापर्यंत गेली.Rare Ahir fish found in Jayakwadi dam

या माशाचे वजन दोन किलो आहे. ज्या मच्छिमारांना हा मासा सापडला ते कमालीचे खुश झाले. हा मासा केवळ आशिया खंडात सापडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हा मासा खायलाही स्वादिष्ट आहे. पाण्याबाहेर काढला की हा मासा बुळबुळीत चिकट द्रव सोडतो. हा द्रव औषधी असतो. काही मच्छीमार त्या स्त्रवणाऱ्या द्रवात कणीक भिजवून गोळ्या करतात. त्याला पुन्हा पाण्यात सोडून देतात. औषध म्हणून या गोळ्यांचे सेवन केले जाते.

काय आहेत वैशिष्ट्ये

या माशाला पाच ते वीस हजार रुपयां बोली लागते. पूर्ण वाढलेला अहीर पाच फूट लांब आणि पंधरा ते वीस किलो वजनाचा असतो. यावरून त्याचे मोल ठरवले जाते. दहा ते पंधरा वर्षांपर्यंत तो जगू शकतो. तो नेहमी जोडीने राहतो. त्यामुळे एकाच वेळी दोन मासे सापडू शकतात. त्याच्या शरीरात प्राणवायूची पिशवी असते. त्यामुळे पाण्याबाहेर काढल्यानंतरही तो बराच वेळ जगू शकतो. चवीला स्वादिष्ट असतो. Rare Ahir fish found in Jayakwadi dam

अहीर हा मासा पूर्वीपासूनच दुर्मिळ आहे. प्रत्येक जातीच्या माशात औषधी गुणधर्म असतातच. मात्र, अहीरला ग्राहकांची एवढी पसंती असेल, तर त्याचे संरक्षण व संवर्धन करून पैदाशीला चालना द्यायला हवी. मत्स्यपालन विभागाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे जाणकार सांगतात. औषधी गुणधर्म असलेला अहीर मासा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा मासा आशियायी देशाचे एका अर्थाने भूषण आहे. प्राचीन काळापासून त्याबाबत वेगवेगळ्या दंतकथा ऐकायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Case: डान्सरचा नाद, उपसरपंचाचा घात; गोविंद बर्गेंनी स्वत:वरच का गोळ्या झाडल्या? नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: अभिनेता किरण मानेच्या फेसबुक पोस्टविरोधात भाजप आक्रमक

IOCL Recruitment: खुशखबर! इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; मिळणार १,६०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Navi Mumbai : गुड न्यूज! नवी मुंबई एअरपोर्ट लवकरच सुरू होणार, ३० सप्टेंबरला PM मोदींच्या हस्ते उद्घाटन? |VIDEO

Crime: सासुरवाडीत जावयाची निर्घृण हत्या, घरगुती वाद मिटवताना भयंकर घडलं; चाकू अन् कुऱ्हाडीने वार नंतर...

SCROLL FOR NEXT