Horoscope in Marathi
Horoscope Saam tv

Friday Horoscope : वरिष्ठांच्या आशीर्वादाने यश मिळेल; आजचा दिवस ठरणार ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट

Friday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना यश मिळेल. तर काहींच्या आयुष्यात आज शुक्रवारी टर्निंग पॉइंट येणार आहे.
Published on

पंचांग

शुक्रवार,५ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी-प्रतिपदा २४|४६

रास-वृषभ २२|१६ नं. मिथुन

नक्षत्र-रोहिणी

योग-सिद्ध ०८|०८

साध्य २७|४९

करण-बालव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा योग आहे. आर्थिक लाभ होतील. पैशाची अवस्था चांगली राहण्यामुळे मनस्वास्थ्य सुदृढ असेल.

वृषभ - व्यवसायासाठी आपली रास अर्थत त्वाची असल्यामुळे कायमच प्राधान्य देते. आज नवीन मंत्र तंत्र कामाच्या ठिकाणी अवलंबू शकाल. शत्रू पीडा नाही. दिवस चांगला आहे.

मिथुन - काही कारण नसताना दिरंगाई होण्याची आज शक्यता आहे. अर्थातच महत्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. अध्यात्माला जवळ केल्यास मनोबल चांगले राहील.

Horoscope in Marathi
Tulsi Plant Vastu Tips: घरात पैसा टिकणार नाही, लक्ष्मीही होईल नाराज; चुकूनही तुळशीजवळ ठेवू नका या गोष्टी

कर्क - प्रियजनांचा सहवास कोणाला आवडत नाही? त्यात आपली जलतत्त्वाची रास भावनेने ओथांबलेली असते. आज अशाच लोकांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी सुद्धा पार पडणार आहे. दिवस लाभदायक आहे.

सिंह - पुढाकार घेऊन कामे करायला आपल्याला आवडते. आज तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. मग आनंदी आणि आशावादी राहिल्यामुळे कामाला एक चांगले वळण आणि चलन येईल.

कन्या - आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान यांनी भरलेला आजचा दिवस असेल. प्रवासासाठी नियोजन करत असाल तर मोठे प्रवास होतील. वरिष्ठांच्या आशीर्वादाने यश मिळवाल.

तूळ - दैनंदिन कामामध्ये व्यत्यय येण्याचा दाट संभव आहे. सावधपणे कामे करावी लागतील. कोणाच्याही मोहाला बळी पडू नका. कुठे जामीन राहू नका.

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळतील. प्रसिद्धी लाभेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. व्यवसायामध्ये धाडसाने आणि धडाडीने काही निर्णय आज घ्याल.

धनु - आरोग्याच्या तक्रारी राहतील. खर्चाचे प्रमाणही वाढेल. काही निर्णय चुकीचे ठरतील .त्यामुळे मनस्ताप होईल कामाच्या धावपळीत आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस आज सांभाळा.

Horoscope in Marathi
Vastu Tips Of Home Cleaning: रविवारी घराची साफ- सफाई करताय? लादी पुसण्याची योग्य वेळ कोणती?

मकर - शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगतीचे योग आहेत. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. संतती सुखदायक वार्ता मिळतील. शंकराची उपासना फलदायी ठरेल.

कुंभ - राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कामानिमित्त प्रवास होतील. नवे वाहन घेण्याच्या विचारात असाल तर आज त्या गोष्टी मार्गी लागतील. वाहन सौख्याला दिवस चांगला आहे.

मीन - दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. धर्म, अध्यात्मात प्रगती होईल. नव्याने काही गोष्टी समोर आल्या तरी जिद्द आणि चिकाटीने आज पूर्ण करणार आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com