बघा आता हे, बँकेनेच कर्जदाराला ६४ लाखांंना गंडवलं

बघा आता हे, बँकेनेच कर्जदाराला ६४ लाखांंना गंडवलं

अहमदनगर ः थकबाकीपोटी जप्त केलेला संगमनेरातील प्रकल्प बिनशेती जमिनीवर असल्याचे सांगत, तो विकत घेण्यास भाग पाडले. तीन वर्षे कारखाना चालविल्यानंतर जागा बिनशेती नसल्याची माहिती महसूलने बजावलेल्या नोटिशीमुळे समोर आली आहे. यामुळे संबंधित उद्योजकाच्या पायाखालची जमीन सरकलीय. कर्ज देणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापकाने दलालाच्या मध्यस्थीने तो फसवणूक केल्याचे उघड झाले.

अखेर या बाबत नितीन अंबादास पिसे (नवी मुंबई) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुंबईतील बँकेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ (रा. ऐरोली, नवी मुंबई) व दलाल ज्ञानदेव सुराजी मते (रा. ठाणे) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. Debt fraud by bank managers

बघा आता हे, बँकेनेच कर्जदाराला ६४ लाखांंना गंडवलं
Pravin Darekar On Narayan Rane | राणे संतापले म्हणून काय झालं,ते आमचे नेते: प्रवीण दरेकर, पाहा व्हिडिओ

या बाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कागदाच्या पिशव्या तयार करणाऱ्या नितीन पिसे यांनी २०१५ साली व्यवसायवृद्धीसाठी नवीन युनिट घेण्यासाठी संबंधित बँकेच्या मुंबई शाखेकडे कर्ज मागणी केली होती. त्यानुसार जानेवारी २०१६ मध्ये त्यांचे बारा लाख रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले. त्यांच्या दोन वेगवेगळ्या खात्यांत प्रत्येकी सहा लाख याप्रमाणे रक्कमही बँकेकडून वर्ग करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणांनी त्यांना ही रक्कम काढता येत नव्हती. दरम्यान, व्यवस्थापक तराळ याने कर्जाच्या थकबाकीपोटी बँकेने जप्त केलेल्या संगमनेरातील कागदी बॉक्स बनविणाऱ्या कारखान्याची माहिती देत हा प्रकल्प विकत घेण्यासाठी गळ घातली.

मंजूर कर्ज मिळत नसल्याने, पिसे यांनी अखेर ६५ लाख रुपयांत प्रकल्प घेण्याची तयारी दर्शवली. तराळ यांनी संगमनेरातील खरेदीच्या सर्व प्रक्रिया दलाल ज्ञानदेव मते यांच्या मदतीने ९ मार्च २०१६ रोजी संगमनेरच्या दुय्यम निबंधकांकडे विक्री प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे तयार केली. त्यातील सूचित ही मिळकत बिनशेती नमूद करण्यात आली होती. संगमनेरातील ही मिळकत पिसे यांच्या नावावर होऊन त्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वर्ग झाली. लागलीच ती बँकेने मिळकतीच्या पोटी वळवूनही घेतली. Debt fraud by bank managers

डिसेंबर २०१८ मध्ये पिसे यांना संगमनेर तहसील कार्यालयाने नोटीस बजावल्याने ही जागा अनधिकृत असल्याचे त्यांना समजले. त्यापोटी थकीत महसुलाचीही मागणी केली. माहितीच्या अधिकारात ती शेतजमीन असतानाही बँकेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ व दलाल ज्ञानदेव मते यांनी बिनशेती भासवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आले. या बाबत आज पिसे यांनी दोघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com