जालना : महाविकास आघाडीतील (MVA) धुसफूशी राज्याला हानीकारक असल्याचं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे ते बदनापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादीचे परभणीतील काही नगरसेवक फोडल्यानंतर दानवे यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. यांचे नगरसेवक त्यांनी फोडायचे त्यांचे नगरसेवक यांनी फोडून मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष विचलित करायचं हा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडीचा सुरू असून भारतीय जनता पार्टीने (BJP) लोकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं दानवे म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीत भाजप वर टीका करत सरकार पडणार आहे हे फक्त भाजप मधून बाहेर पडणाऱ्यांना थांबवण्यासाठी दिलेलं आश्वासन आहे असं म्हटलं होतं यावर देखील दानवे (Raosaheb Danave) यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'नाना पटोले यांना पक्षातून बाहेर पडण्याचा चांगला अनुभव आहे असं सांगत एकेकाळी भाजपाचे देशात केवळ 2 खासदार निवडुन आले होते या 2 खासदारांच्या बळावर भाजपने कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करत देशात 303 खासदार निवडून आणलेत. भाजपचे कार्यकर्ते पळपुटे नसून याच कार्यकर्त्यांच्या बळावर 2024 ला पुन्हा या राज्यात भाजपची सत्ता येईल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा (Mumbai-Nagpur Bullet Train) आराखडा या महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल. आता केवळ 38 टक्के जमीन संपादित करावी लागणार असून ईतर जमीन राज्य सरकारने संपादीत केलेली आहे. बुलेट ट्रेन साठी रेल्वे पटरी जवळच्या झोपडपट्टया तोडल्या जाणार आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेत बसवायचं की नाही हा राज्य सरकारचा विषय आहे असंही दानवे म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.