कुराणाची विटंबना केल्याच्या संशयावरुन जमावाने केली झाडाला टांगून दगडाने मारहाण; एकाचा मृत्यू

मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ असणाऱ्या कुराणची (Quran) विटंबना केल्याच्या संशयातून जमावाने एक जणाला झाडाला बांधून जमावाने दगडाने मारहाण केली आहे. या मारहाणीत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही देखील जमाव त्याच्यावरती दगड मारत होता.
कुराणाची विटंबना केल्याच्या संशयावरुन जमावाने केली झाडाला टांगून दगडाने मारहाण; एकाचा मृत्यू
कुराणाची विटंबना केल्याच्या संशयावरुन जमावाने केली झाडाला टांगून दगडाने मारहाण; एकाचा मृत्यू Saam Tv
Published On

इस्लामाबाद : पाकिस्तानातील (Pakistan) पंजाब प्रांतात मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ असणाऱ्या कुराणची (Quran) विटंबना केल्याच्या संशयातून जमावाने एक जणाला झाडाला बांधून जमावाने दगडाने मारहाण केली आहे. या मारहाणीत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही देखील जमाव त्याच्यावरती दगड मारत होता. आणि धक्कादायक बाब अशी की घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाही.

काय आहे प्रकरण -

जमावाने हत्या केलेल्या व्यक्तीवरती त्याने कुराणाची पाने फाडल्याचा आरोप होता. सदरची घटना शनिवारी जंगल डेरा या गावात घडली आहे. जंगल डेरा या गावात मयत व्यक्तीने कुराणची काही पाने फाडली आणि त्याला आग लावल्याच्या संशयावरुन मगरीबच्या नमाजला जमलेल्या शेकडो लोकांनी त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडाने मारहाण केली आहे.

कुराणाची विटंबना केल्याच्या संशयावरुन जमावाने केली झाडाला टांगून दगडाने मारहाण; एकाचा मृत्यू
Rahul Bajaj : देशाच्या औद्योगिक क्षेत्राला दिशा आणि मार्गदर्शन देणारं नेतृत्व हरपलं - गृहमंत्री

या घटनेचं वृत्त डॉन न्यूजमध्ये (Dawn News) प्रसिद्ध झाले आहे. या बातमीमध्ये सांगण्यात आलं आहे की सदर पीडित व्यक्ती तो निर्दोष असल्याचा दावा करत होता मात्र त्याचं कोणीही ऐकायला तयार नव्हत. गावकऱ्यांनी त्याला आधी झाडाला टांगले आणि नंतर दगडाने ठेचून मारले.

दरम्यान कुराणचा अपमान केला म्हणून याआधी देखील अनेक लोकांची हत्या करण्यात आल्या आहेत. द एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील बातमीनुसार, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये, खैबर पख्तूनख्वाच्या चारसद्दा जिल्ह्यातही जमावाने एका पोलिस स्टेशनची तोडफोड करत आग लावली होती या हिंसेच कारण असं की अधिकाऱ्यांनी कुराणचा अपमान केल्याबद्दल अटक केलेल्या व्यक्तीला जमावाच्या ताब्यात द्यायला विरोध केला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com