Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

पोलिसांनी सूचना देऊनही राणा मुंबईत आलेच- उपमुख्यमंत्री

राणांना पोलिसांनी आंदोलन करू नका म्हणून सांगितलं

अभिजित सोनावणे

नाशिक : कोणी कुठं काय म्हणावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पोलिसांनी न जाण्याची विनंती करूनही मातोश्रीवर जाण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मातोश्रीबाहेर घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात (state) कायदा सुव्यवस्थेवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की ज्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत.

हे देखील पहा-

कायदा सुव्यवस्था (Law & Order) निर्माण होण्याचा प्रश्न होणार आहे, त्या गोष्टी टाळायला हवे. अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी (police) मातोश्रीवर जाऊ नये असे सांगितले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही, शेवटी जे व्हायला नको होते ते झाले, अशी नाराजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी बोलून दाखवली. ज्यांना काही प्रार्थना करायची आहे, त्यांनी ती घरी करावी किंवा मंदिरात जाऊन करावी. त्यांना अनेकदा पोलिसांनी सांगितले तरी ते आले. शेवटी शिवसैनिक आक्रमक झाले. जे व्हायला नको होते, तेच झाले.

पोलिसांनी त्यांना विनंती करून देखील त्यांना न येण्याचे आवाहन केले होते. मात्र तरी ते आले. यामुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या. ज्यावेळेस एखादा जमाव प्रक्षुब्ध असतो, तिथे जाणे योग्य नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागायला हवे. राज्यकारभार करत असताना सगळीकडे शांतताच राहायला हवी, कोणालाही त्रास होता कामा नये, ही भावना आहे. तपास यंत्रणा म्हणूनच पोलिसांचे काम आहे. ते त्यांचे काम करत आहेत.

केंद्राची सुरक्षा असो किंवा नसो. कोणावर देखील हल्ला होता कामा नये. आपण पण कोणाला देखील उचकावण्याचा प्रयत्न करू नये. दुसऱ्यावर राग काढण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे. ही पवार साहेबांची शिकवण आहे. राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका. राजकीय हस्तक्षेप कुणी देखील करू नये. सगळ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, तर असे प्रश्न निर्माण होणार नाही. आपण कारभार करत असताना राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावे, ही शिकवण पवार साहेबांची आहे, असे ते यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई -गोवा महामार्गावर सलग 5 व्या दिवशी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Central Government: मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ती एक मागणी मान्य, UPS, NPS मध्ये केले बदल

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, PSI बदने अन् बनकरबाबत धक्कादायक माहिती

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Hit And Run : प्रसिद्ध अभिनेत्रीनं दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT