पुन्हा कोरोनाची दहशत; गेल्या 24 तासांत 2,593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
Corona In India
Corona In IndiaSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत २५९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात १७५५ रुग्णांनी कोरोनावर (corona) मात केली आहे. काल देशात कोरोनाचे २५२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला.

हे देखील पहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ८७३ इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात १८५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे (corona) जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २२ हजार १९३ इतकी झाली आहे. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २५ लाख १९ हजार ४७९ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

याबरोबरच देशात सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत १८७ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरामध्ये देशात १९ लाख १३ हजार २९६ कोरोना लसी देण्यात आले आहेत. भारतात आतापर्यंत १८७ कोटी ४६ लाख ७२ हजार ५३६ कोरोनाच्या लसी देण्यात आले आहेत.

Corona In India
'लोकशाहीला न शोभणारं कालचं कृत्य'- रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

दिल्लीत कोरोनाचा परिस्थिती

राष्ट्रीय राजधानीत गेल्या काही दिवसांपासून (Covid) कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीत (Delhi) संसर्गाची 965 नवीन प्रकरणे समोर आली. बुधवारी कोरोनाचे 1,009, मंगळवारी 632 आणि सोमवारी 501 रुग्ण आढळले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com