Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

हिंदूंना लुटणारं सरकार सत्तेत; रामाचं धनुष्य चोरणाऱ्यांची लंका 'मशाली'नं जाळणार, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Leads Ramraksha Agitation : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व दादर येथील हनुमान मंदिरात 'रामरक्षा' आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगीबाबतच्या कथित वादावरून भाजपवर टीका केली.

Bharat Jadhav

  • उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामरक्षा आंदोलन करण्यात आले.

  • अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले.

  • आंदोलनादरम्यान रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालीसा आणि महाआरती करण्यात आली.

'कोणी मंदिर लूटत असेल तर हिंदू त्यांना माफ करणार नाही. हिंदूना लुटणारं सरकार सत्तेत बसलंय. ज्यांनी रामाचं धनुष्य चोरलंय त्यांची लंका मशालीनं जाळणार', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन आंदोलन करण्यात आले. यावेळी महाआरती करण्यात आली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

अयोध्येथील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. त्याच्या निषेधार्थ 'रामरक्षा आंदोलन' करण्यात आले. दादरच्या हनुमान मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालीसा म्हणत हे आंदोलन केले गेले. यासाठी अनेक महंत आणि पंडित मंदिराजवळ पोहचले. प्रवक्ते आनंद दुबे यांच्यासह अयोध्यायेथील ही काही पंडित या आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपकडून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका केली जातेय परंतु येथे अख्खा हिंदू समाज माझ्यासोबत आहे. माझ्या समोर उभा आहे. पण सत्तेतील भाजपनं राम मंदिरात चोरी केली असून त्यांना त्या चोरांना प्रभु रामाचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलंय.

अयोध्येमधील राम मंदिरासाठी कारसेवकांना आपलं रक्त सांडलंय. हिंदूच्या कष्टाचा पैसा वापरला गेला. शिवसेनेनेने राम मंदिरासाठी मठं योगदान दिलंय. शिवसेनेने राम मंदिरासाठी चांदीची विट दिली होती असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भापला थेट चोरांची उपमा दिली आहे.

आपला हिंदू समाज भोळा, भाबडा आहे, पण मूर्ख नाहीये, त्यामुळे हिंदूंचा पैसा लुटणाऱ्या चोरांना कधी माफ करणार नाही. हिंदूंचे पैसे लुटता लाज वाटली पाहिजे. हिंदूंचा पैसा लुटणारं सरकार सत्तेत बसलंय. त्यामुळे हे राम रक्षा आंदोलन प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवा. रामाचे नाव घेतलं तर भूत देखील पळून जातात, भाजपमधील काय चीज आहेत. यामुळे एकजुटीनं या चोरांना हद्पार करा. भाजपला दिल्लीत बसवणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू झालं असून महाराष्ट्र एकदा जागा झाला तर संपूर्ण देश जागा होतो, असं ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT