Maharashtra Assembly Election Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : फलटणमध्ये महायुतीत फूट? अजित पवार गटाचे मोठे नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत

Ramraje Naik Nimbalkar : अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहे. आता रामराजे यांनी भापने त्यांना साथ दिली तर तुतारी फुकांयला किती वेळ लागतो, असा इशारा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

ओंकार कदम, सातारा, साम टीव्ही प्रतिनिधी

फलटणमध्ये महायुतीत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहे. दरम्यान भाजपच्या रणजीत नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीची दखल न घेतल्यास यापुढील काळात तुतारी हातात घेऊ, असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

आज फलटण येथे आयोजित केलेल्या एका बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या रणजीत नाईक निंबाळकर यांच्या विषयी अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. गल्लोगल्ली दहशत करणाऱ्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी आमची तक्रार आहे. त्यांना भाजपने साथ देऊ नये. अन्यथा आम्ही तुतारी हातात घेऊ असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीतील वरिष्ठांना दिला आहे.

आम्ही कधी दोन समाजात देढ निर्माण करत नाही, आमची तक्रार फक्त जे गल्लोगल्ली दहशत पसरवतायेत त्यांच्या विषयी आहे. त्यांच्या दहशतीला भाजपने साथ देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. तुम्ही तयारीने या महिला येऊ देत आणि एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपवून टाकू. आणि जर काही फरक पडला नाही, तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतो, असं विधान रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indapur Politics: इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, भावाने दिला विरोधी उमेदवाराला पाठिंबा

Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

SCROLL FOR NEXT