Ramdas athawale News :  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंनंतर आणखी एक नवे समीकरण? केंद्रीय मंत्र्यांची ऑफर, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार

Ramdas athawale News : ठाकरे बंधूंनंतर आणखी एका समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्यामुळे नव्या समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.

Vishal Gangurde

राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यात राजकीय भूंकप येण्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये एक्याचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना ऐक्याची हाक दिली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ऑफरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची चर्चा सुरु झाली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना रिपाई ऐक्यासाठी साद दिली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर आम्ही एकत्र आलो पाहिजे. रिपाईच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. असेच आमचे प्रयत्न असणार आहे'.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलं. 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येतील असे वाटत नाही. त्यांनी जरूर एकत्र यावे. ते एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल. ते एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही'.

हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरही आठवलेंनी भाष्य केलं. 'मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी आलं पाहिजे. हिंदीय भाषेला काहींचा विरोध आहे. हिंदी भाषेला विरोध होऊ नये. मुंबईत मराठीत बोललं पाहिजे, असे विषय घेणे चुकीचे आहे. यात बँका मराठीत चालवणे अशक्य आहे. बोर्ड मराठीत ठीक आहे,असे आठवले पुढे म्हणाले.

'मराठी राज्यभाषा म्हणून मान्यता दिली आहे. पण हिंदीला विरोध करणे योग्य नाही. मराठी-हिंदी भाषा वाद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी करू नये. दादागिरी करणाऱ्यांना माफ करू नये. मुंबईत फूट पाडणे योग्य नाही. फुटीरतावादी लोकांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, असे आठवले पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT