Ramdas Athawale praises Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Election : शरद पवार खमक्या माणूस; महायुतीच्या स्टेजवरच रामदास आठवलेंकडून कौतुकवर्षाव

Ramdas Athawale Speech : रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. नाशिकमधील महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

अभिजीत सोनावणे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असतानाच, नाशिकमध्ये महायुतीचे नेते आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शरद पवार खमक्या माणूस आहे, असं आठवले म्हणाले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

रामदास आठवले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीनेच भाषणाला सुरुवात केली. कवितेच्या ओळींमधून सुरुवात करतानाच, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे बारा बाजवू, तसेच काँग्रेसला संपवू, असा नारा देखील त्यांनी दिला.याशिवाय संविधान, मराठा आरक्षण, लाडकी बहीण योजना आदी मुद्द्यांवरही सडेतोड भाष्य केलं.

रामदास आठवले यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

रामदास आठवलेंनी कवितेतून केली भाषणाची सुरुवात

देऊया आपण भारतमातेचा नारा,निवडणुकीत वाजवूया महाविकास आघाडीचे बारा

भारतात अर्थव्यवस्था उत्कृष्ट पद्धतीची आहे

मविआला लोक म्हणतात हाय हाय,उद्धव ठाकरेंना लोक म्हणतात अडीच वर्षे केलं काय?

मी शिवसेना आणि भाजपात जाण्याचा निर्णय घेतला

मी ज्यांच्यासोबत जातो, त्यांची सत्ता येते,पण ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा होतो सत्यानाश

उद्धव ठाकरेंना सांगत होतो सोबत राहा...

शरद पवारांवर अन्याय केला!

शरद पवारांनाही म्हंटलो मी इकडे आलो, तुमचं तिकडे काय काम?

अजितदादांसह काही आमदार आमच्यासोबत आले आहेत.

शरद पवार यांना सोनिया गांधींनी पंतप्रधान बनू दिले नाही.अन्याय केला

मनमोहन सिंग यांना संधी दिली. आता पवार साहेब यांना पंतप्रधानपद द्या असं म्हणालो होतो पण सोनिया गांधींनी ऐकलं नाही,पवार साहेब खमक्या माणूस.

राहुल गांधी, काँग्रेसला इशारा

काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पर्वा नव्हती.

मोदीजी आंबेडकर यांचे नाव सातत्याने घेतात. राहुल गांधी संविधान बदलणार आहेत.

राहुल गांधींनी आरक्षण संपविले तर आम्ही काँग्रेसला संपवू.

आमचं आरक्षण कोणीही संपवू शकणार नाही.

गावागावातील मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे.

10 टक्के मराठ्यांना आरक्षण दिले आहे,केंद्रही त्याचा विचार करेल.

लाडक्या बहिणींचा फायदा होणार आहे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी

महायुतीला निवडून द्या, दलित आणि बौद्ध बांधवांना माझे आवाहन

संविधान वाचविण्यासाठी महायुतीला मतदान करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT