Ramdas Athawale on Prakash Ambedkar Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale: 'वंचित' बरखास्त करुन RPI मध्ये या, मी नेतृत्व सोडतो', रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर

Ramdas Athawale Offer to Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे आवाहन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.

ओंकार कदम

सातारा, ता. ३ ऑक्टोबर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांना आरपीआय पक्षात एकत्र येण्याचे आवाहन करत रामदास आठवलेंनी आरपीआयचे नेतृत्व सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी त्यांनी विधानसभेच्या जागा वाटपावरुनही महायुतीला मोठा इशारा दिला आहे. साताऱ्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

आरपीआय नेते रामदास आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआयसोबत यावे मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे आवाहन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.

यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी विधानसभेच्या जागा वाटपावरुनही महायुतीला मोठा इशारा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी करत महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरून काम करू नका, असा मोठा इशाराही दिला. तसेच राज्यात महायुतीच्या 170 चा पुढे जागा निवडून येतील' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमित शहा यांनी समान नागरी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी सहमती दर्शवली. अमित शहा यांनी समान नागरी कायदा आणणार असं विधान केलं आहे त्याबाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी कायदा आला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT