Maharashtra Legislative Council Chairman Prof. Ram Shinde directs immediate measures against fake job app scams during a meeting held in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

बेरोजगार तरुणांची फसवणूक थांबवा! बनावट रोजगार ॲप्सवर राम शिंदेंचा कडक इशारा|VIDEO

Ram Shinde Orders Strict Action: महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या बनावट रोजगार ॲप्सविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Omkar Sonawane

राज्यातील बेरोजगार तरुणांची रोजगार देण्याच्या आमिषाने बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची पोलीसांकडून तातडीने दखल घेण्यात यावी तसेच या संदर्भात येत्या 15 दिवसात अतिरिक्त मुख्य सचिव, गृह यांच्याकडे बैठक घेण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज दिनांक 28 ऑक्टोबर, 2025 रोजी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी पावसाळी अधिवेशन-2025 मध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाचे चिन्ह वापरुन असे बनावट ॲप तयार केले जातात. बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून या ॲपद्वारे पैसे उकळले जातात. काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तरुण पोलीसात तक्रार दाखल करायला जातात त्यावेळी त्यांना ताटकळत ठेवले जाते, तक्रार दाखल करुन घेतली जात नाही. बनावट ॲप चालवणाऱ्या टोळ्या यांचे पोलीसांशी संगनमत असण्याची शक्यता आहे, असे मुद्दे यावेळी विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी उपस्थित केले.

या महत्वाच्या बैठकीला राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळ व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. गृह विभागाचे सह सचिव श्री. राहुल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त श्री.बजरंग बनसोडे, सायबर विभागाचे श्री. प्रविण बनगोसावी बैठकीस उपस्थित होते.

अशा प्रकारच्या गुन्हृयांना कडक प्रतिबंध व्हावा या दृष्टिने निश्चित उपाययोजना करणे आवश्यक असून या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव, गृह यांनी 15 दिवसाच्या आत विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे आणि सर्व संबंधितांची बैठक घ्यावी आणि निश्चित स्वरुपाची उपाययोजना करावी, असे निर्देश यावेळी विधानपरिष सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

SCROLL FOR NEXT