Raksha Khadse Saam Tv News
महाराष्ट्र

Raksha Khadse: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड, जळगाव हादरले

Daughter of Raksha Khadse Molestation Case: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसबोत टवाळखोरांनी छेडछाड केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर जळगावात संतापाची लाट उसळली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याचं प्रकरण ताजे असतानाच जळगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. रक्षा खडसे यांची मुलगी तसेच तिच्या मैत्रिणींसोबत यात्रेला गेली होती. या यात्रेत टवाळखोरांनी छेड काढली. या घटनेनंतर चहुबाजूने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

या घटनेनंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. टवाळखोरांना अद्याप अटक न झाल्यामुळे जळगावमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्यानंतर संतापलेल्या रक्षा खडसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

नेमकं घडलं काय?

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे यात्रा सुरू आहे. या यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गेली होती. यात्रेत काही टवाळखोर आले होते. त्यांनी भर यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली होती. सुरक्षरक्षकानं त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. मुलींना धक्काबुक्की करायला सुरूवात केली.

सुरक्षारक्षाकानं तातडीनं पोलीस ठाण्यात जात टवाळखोरांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्यामागोमाग भाजपच्या नेत्या रक्षा खडसे पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशा सुचना दिल्या.

गुन्हा घडूनही अद्याप आरोपी मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे टवाळखोरांना अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT