Wai women protesting against illegal stone crushers, marching to Mumbai for justice. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Raksha Bandhan Protest : वाई तालुक्यातील बेकायदेशीर दगडी खाण आणि क्रेशरमुळे होणारे प्रदूषण व आरोग्य समस्या वाढली. रक्षाबंधनाच्या ओवाळणीत ₹१५०० नको, बेकायदेशीर क्रेशर बंद करा, अशी मागणी.

Namdeo Kumbhar

  • सातारा वाई तालुक्यातील महिलांचा बेकायदेशीर खाण-विरोधी लाँग मार्च

  • रक्षाबंधनावर ₹१५०० नाकारून क्रेशर बंद करण्याची मागणी

  • मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून न्यायाची साद

  • २२ दिवसांत वाई ते मुंबई असा प्रवास करत आंदोलन

CM Devendra fadnavis : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. रक्षाबंधानाचे निमित्त साधत राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रूपये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पण साताऱ्यातील काही लाडक्या बहि‍णींना १५०० रूपये नको आहेत, त्याऐवजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेगळीच मागणी केली आहे. वाईमधील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून आपली मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्राची दखल घेणार का? ओवाळणी म्हणून देवेंद्र फडणवीस त्या लाडकीची मागणी मान्य करणार का? पाहूयात नेमकं प्रकरण काय आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध पद्धतीने दगडी खाण, स्टोन क्रेशर सुरू आहेत. याचा वाईतील स्थानिक लोकांवर विविध परिणाम होत आहेत. धूळ आणि प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार आणि इतर आरोग्य समस्या वाढत आहेत. दीर्घकाळ ध्वनिप्रदूषणामुळे ऐकण्याच्या समस्या आणि तणाव वाढू शकतो. अनेकांना दमा, खोकला यासारख्या समस्या वाढल्या आहेत. खाणकामामुळे जवळील पाणवठ्यांमध्ये गाळ साचणे किंवा रासायनिक प्रदूषण होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी याविरोधात आंदोलने केली असून, क्रशर परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. अनेकदा आंदोलन करूनही हा प्रश्न सुटत नसल्यामुळे लाडक्या बहि‍णींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओवाळणी मागत स्टोन क्रेशर बंद करण्याची मागणी केली आहे.

मागणी काय आहे ?

वाई तालुक्यातील महिलांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित न्याय मागितला आहे. देवा भाऊ ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या, असे म्हटले आहे.

१५०० नको, मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र

मागील 22 दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढला आहे. वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला दगडी खाण क्रेशर बंद करण्यात यावी, या मागणीसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून बेकायदेशीर क्रेशर बंद करण्यात यावे, अशा मागणीसाठी लाडक्या बहिणींनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले आहे. रक्षाबंधनाची भेट दीड हजार रुपये नको क्रेशर बंद करा, आम्हाला न्याय द्या अशी भावनिक साद यावेळी वाईतील महिलांनी घातली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajar Halwa: गाजर न किसता घरीच बनवा हलवा,सोपी आहे रेसिपी

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस आता धावणार नागपूर ते पुणे, पण कधीपासून? वाचा...

Hospital Fire: हॉस्पिटलमध्ये भीषण आग; खिडक्यांच्या काचा तोडून रुग्णांना काढलं बाहेर, घटनास्थळी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Maharashtra Live News Update: पुण्यातील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात

Vande Bharat Express : नगरला मिळाली वंदे भारत एक्सप्रेस, पुणे-नागपूरचा प्रवास झाला वेगवान; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT