सांगली : आज रक्षाबंधनानिमित्तRakshabandhan प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखीRakhi बांधत असके त्यातून ती भावाप्रती असलेलं प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत असतात. आज या राखीच्या नात्याला मंत्री जयंत पाटीलJayant Patil यांना एक वेगळाच आणि भावविक क्षण अनुभवायला मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी दिल्याने तालुक्यातील महिलांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना राखी बांधत औक्षण केले आहे. दरम्यान हा क्षण माझ्यासाठी फार भावनिक असून या भगिनींनी दिलेल्या प्रेमाबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.. Rakhi for Jayant Patil built by women of Jat taluka
हे देखील पहा-
गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याची ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती.या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात जयंत पाटील यांनी घेतला. जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याच्यादृष्टीने जयंतराव पाटील यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याने तालुक्यातील जनता समाधानी आहे.याच कामासाठी महिलांनी मंत्री जयंत पाटलांचे औक्षण करुन त्यांना त्यांच्या या कामाची पोचपावती दिली म्हणायला हरकत नाही.
Edited By-Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.