CM Devendra Fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

...तरच भाजप राज्यसभेसाठी ५ वा उमेदवार देणार, शरद पवारांसोबत कनेक्शन; देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लान काय?

Devendra Fadnavis Rajya Sabha election strategy: राज्यसभेच्या ७ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यसभेसाठी भाजप पाचवा उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More

Summary -

  • राज्यसभा निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

  • शरद पवार यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीत एकमत नाही

  • शरद पवार उमेदवार नसतील तर भाजप पाचवा उमेदवार देणार

  • देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गणेश कवडे, मुंबई

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे असं असतानाही दोन्ही आघाड्यांमध्ये 'वेट अँड वॉच'ची भूमिका कायम आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांच्या उमेदवारीवरून अद्याप एकमत होऊ शकले नाही. तर दुसरीकडे भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. शरद पवार उमेदवार नसतील तर भाजप आपला पाचवा उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. या राजकीय खेळीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका आहे. राज्यसभेसाठी उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक राहिला असला तरी उमेदवारी यादी प्रलंबित आहेत. शरद पवारांना उमेदवारी देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याने अद्यापही घोषणा करण्यात आली नाही. राज्यसभेच्या एकमेव जागेवर शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा केला आहे. या एका उमेदवारीमुळे तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा हवाला देत काँग्रेसकडून दावा कायम आहे तर शिवसेनेचाही राज्यसभेसाठी आग्रह आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या भूमिकेवर भाजप नवा डाव टाकण्याची शक्यता आहे. शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर भाजप पाचवा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार उमेदवार नसल्यास भाजपचे ५ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नव्या चेहऱ्यांमध्ये एका महिलेचा देखील सहभाग असणार आहे. रामदास आठवले यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. आज राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT