Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Rajyasabha Election: शरद पवारांना पराभूत करण्यासाठी शिंदेचा मास्टरप्लान?, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार

Maharashtra Rajya Sabha Battle: राज्यसभा निवणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा मास्टरप्लान केला. शरद पवार यांच्याविरोधात शिवसेनेकडून २ उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary -

  • महाराष्ट्रात १६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होणार

  • शरद पवार महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून मैदानात

  • एकनाथ शिंदे यांची रणनीतीमुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता

  • शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू

सूरज मसूरकर, मुंबई

राज्यसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभं केले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्याविरोधात शिवसेनेकडून दोन उमेदवार दिले जाण्याची दाट शक्यता आहे. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्वाची बैठक पार पडली.

शरद पवारांसमोर एकनाथ शिंदे यांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. राज्यसभा निवडणुकीत आकड्यांचा खेळ रंगणार असून सामना रोमांचक होणार आहे. शिवसेना मोठा राजकीय डाव खेळण्याच्या तयारीत असून शरद पवारांना मात देण्याची एकनाथ शिंदे यांची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. १६ मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसह देशातील १० राज्यांमधील एकूण ३० जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे ६ आणि महाविकास आघाडीचा १ उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना शरद पवारांना धक्का तंत्र देण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून २ उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. शिवसेने कडून ज्योती वाघमारे, रोहित टिळक, राहुल शेवाळे, शायना एन सी या चार नावांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. अशातच ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी राजकीय गणित जुळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू होते. दरम्यान, भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तसेच शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआयचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोली येथील भाजप नेते रामराव वडकुते आणि नागपूरच्या भाजप नेत्या माया ईवनाते यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर शिवसेनेने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही आणि नावाबाबत सस्पेन्स कायम आहे. एखाद्या उमेदवाराला विजयासाठी पहिल्या प्राधान्यक्रमाचे किमान ३७ मते आवश्यक असतात. महायुतीकडे एकूण २३२ आमदारांचे समर्थन आहे. शिवसेना शिंदे गटाकडे २० अतिरिक्त मते आहेत, तर अजित पवार गटाकडे ३ अतिरिक्त मते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: मुख्यमंत्री केंद्रात जाणार, निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश; आमदाराची कार फोडली

Neem Juice For Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी प्या कडुलिंबाचा रस, चेहऱ्यावरचे काळे डाग आणि मुरूमे होतील कमी

Hair Care: केस धुतल्यावर खूप तुटतात? या टिप्स आत्ताच करा फॉलो, मजबूत केसांचं सिक्रेट

आता 'या' राज्यात भाजपचा मुख्यमंत्री, मित्रपक्षाचे CM राजीनाम देणार, शपथविधी कधी होणार?

Influencer Death : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या; घरात घुसून चाकूने हल्ला, मनोरंजनसृष्टी हादरली

SCROLL FOR NEXT